आनंद
आज 'आनंद' रिलीज होऊन काही तरी ५३ वर्षे झाली म्हणे. याचा अर्थ गेल्या त्रेपन्न वर्षांपासून आनंद लोकांना जगायला शिकवत आला आहे आणि इथून पुढंही राहील. तसं कित्येकांनी बरंच काही लिहून ठेवलेलं असताना आपणही या पिक्चरबद्दल लिहावं की नको, असा प्रश्न मनात होता. मात्र मोह आवरता आला नाही. भारतीय लोक प्रत्येक स्टोरीमध्ये लव्ह स्टोरी घुसवतात, असा आरोप करणाऱ्या कित्येक विदेशी लोकांना आणि चित्रपट सृष्ट्यांना हा पिक्चर म्हणजे हृषीकेश मुखर्जी यांनी मारलेली बिन आवाजाची जोरदार चपराक आहे, असं मला नेहमी वाटत आलं आहे. आयुष्यात दुःख कुणाला नसतं? कुणाच्या वाट्याला कधी सगळं सुख येतं का? किंवा एक घासून पुसून गुळगुळीत केलेलं उदाहरण म्हणजे आमचा ग्लास 'अर्धा रिकामा' पेक्षा 'अर्धा भरलेला' हे बघायला शिकवणारा हा पिक्चर खरं तर किशोरसाठी तयार होणारा! पण किशोरच्या म्हणे, वॉचमनमुळं तो राजेश खन्नाला मिळाला. म्हणजे प्रारब्ध की काय म्हणतात ना, ते असं! साल १९७१, अजून बच्चन नावाची आँधी चित्रपटगृहावर धडक मारायची होती आणि राजेश खन्नाच्या गुलाबी जर्द रोमान्सचा माहोल असताना 'आनंद' येणं आणि तो राजेश...